खासदार डॉ. अमोल कोल्हे
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सिनेस्टार गोविंदा यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर, मा. मुख्यमंत्री यांनी जी भूमिका मांडली याबद्दल मी त्यांचे आवर्जुन आभार मानले.
याचं कारण, असं आहे की, गेली काही वर्षे सातत्याने शिरूर लोकसभा मतदार संघातल्या मायबाप जनतेनं माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला लोकसभेत निवडून दिलं.
त्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये जे कायम हिणवल जात होतं. मग नाटक्या असेल, नौटंकी असेल, नाच्या असेल आणि खरोखर मग प्रश्न पडतो. हिंदी सिनेसृष्टीतला सिनेस्टार आला तर मग त्यांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करुन आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मा. मुख्यमंत्री महोदयांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आत्ता ज्यांनी पक्ष बदलला ते सातत्याने अशी टीका टिप्पणी करतात.
त्यामुळे मी मा. मुखमंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त केले. आता त्यांनी हे जे समन्वयाची महत्वाची बाब आहे. ती त्यांच्या ही निदर्शनास आणून द्यावी.
मला असं वाटतं की, सिनेस्टार गोविंदा मागे एका टर्ममध्ये खासदार होते. तेव्हाचा त्यांचा परफॉर्मन्स बघावा. आणि मला थोडीशी पातळी सोडुन नाटक्या, नाच्या अशा शब्दात जर कोणी हिणवत असेल त्यांनी 2019 ते 2024 यामधला माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तपासून पाहावा.
पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर मतदार संघाचे अनेक प्रश्न हे मार्गी लावल्यानंतर, हिरहिरीने मांडल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते, यापलीकडे काय बोलणार?
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.