महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे एकमेकांचे मोबाईल फोडल्याच्या रागातून २३ वर्षीय तरुणाचा फेट्याने गळा आवळून व डोक्यात लोखंडी तवा घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू मंगल रकेवार ( वय २३, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महाळुंगे येथे ऋषिकेश शिवळे यांचे रूममध्ये घडली.
याबाबत कालूचा भाऊ पप्पू मंगल रकेवार ( वय ४०, सध्या रा. ऋषिकेश शिवळे यांची खोली, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. पथरीया, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी रामसिंग ( वय ३०, रा. रेयाना, ता. जि. दमूही, मध्यप्रदेश ) याचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे हे पुढील तपास करीत आहेत.
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…
बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…
This website uses cookies.