महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ग्रामपंचायत, कोरोना समिती व करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या गावातील व्यापारी व दुकानदारांची अँटीजन रॅपिड टेस्टिंग करण्यात आली. येथील हनुमान मंदिरात आयोजित कोरोना टेस्टिंगला सकाळी साडे दहा वाजता सुरुवात झाली. गावातील सर्व दुकानदारांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत २१२ दुकानदारांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी १८ जणांचा प्राथमिक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
प्रांताधिकारी विक्रम चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी, सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा गटखने, आरोग्य कर्मचारी मकसूद शेख यांनी खराबवाडी येथे २१२ दुकानदारांच्या कोरोना टेस्टिंग केल्या.
यासाठी ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, कर्मचारी अजित केसवड, विशाल खोपडे, प्रकाश लोहकरे, शंकर धोत्रे, विजय जोगदंड, गणपत कड, काशीनाथ बलांडे, कल्पना जाधव, आशा वर्कर सेविका रेखा धाडगे, कविता म्हस्के, रंजना लांडे यांचे सहकार्य लाभले.
——-
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.