गुन्हेगारी

मोफत औषधोपचार असताना रुग्णाकडून पैसे उकळल्याने नामांकित डॉक्टरसह दोघांना बेड्या, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…

मावळातील पवना हॉस्पिटल मधील धक्कादायक प्रकार


महाबुलेटीन न्यूज
तळेगाव दाभाडे, ( प्रतिनिधी ) : शासकीय योजनेअंतर्गत औषधोपचार पूर्णपणे मोफत असतानाही उपचारासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी रुग्णालयाच्या मार्केटिंग ऑफिसरला रंगेहाथ पकडण्यात आले. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये मंगळवारी (दि. २३) ही कारवाई झाली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सत्यजित कृष्णकांत वाढोकर (वय ५८, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे ) व प्रमोद वसंत निकम (वय ४५, रा. दत्तवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने अटक केलेला आरोपी वाढोकर हा डॉक्टर असून हॉस्पिटलचा संचालक आहे, तर आरोपी निकम हा मार्केटिंग ऑफिसर आहे. 

पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जात असताना ज्येष्ठ नागरिक असलेल्या रुग्णाच्या डायलिसिस व औषधोपचारासाठी आरोपींनी रुग्णाच्या मुलाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर रुग्णाच्या मुलाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, पोलीस निरीक्षक सुनिल बिले, कर्मचारी वैभव गोसावी, प्रशांत वाळके यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना नऊ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

9 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.