चाकण : पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी खराबवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतने कोरोना संदर्भात केलेल्या प्रशासकीय कामाचे कौतुक केले. कोरोनाशी लढा देताना टिमवर्कने काम करा, सॅनिटायझर व मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा त्याचबरोबर खराबवाडी गाव कोरोनमुक्त करा, असे त्यांनी आवाहन केले. मागील पंधरवड्यात सापडलेल्या ११ रुग्णांपैकी अजूनही चार जण ऍक्टिव्ह असून हि साखळी रोखून झिरो करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला केले. मात्र आजच गावात आणखी एक युवक पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. तरीही आम्ही स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळून हि साखळी रोखू असे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने दिले आहे.
दरम्यान आज चाकण-तळेगाव रस्त्यावरून व गावातून मास्क न घालता फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाई करून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे यांनी दिली. यावेळी विस्तार अधिकारी सेवक थोरात, आरोग्य अधिकारी मकसूद शेख, तलाठी आचारी भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी रमेश चौरे, पोलीस पाटील किरण किर्ते, अजित केसवड, विठ्ठल वर्ये, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.