१०० वर्षाची आजी वृद्धापकाळाने मयत होते….
तिची ७० वर्षांची मुलगी वेडसर….दुसरे कोणीही वारस नाही…
कोरोनाच्या भीतीमुळे अंत्यसंस्कारासाठी पुढे कोणी येईना…
अशावेळी खाकी वर्दीतली माणुसकी जागी झाली…
अन बेवारस आजीचा अंत्यसंस्कार पार पडला….
ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील खराबवाडी मधील….
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : महाराष्ट्रातील सर्वच पोलिसांबद्दल समाज भावना चांगल्या नाहीत, असा जनमानसांत समज आहे, परंतु म्हाळुंगे ( ता. खेड, जि. पुणे ) येथील पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कोरोनाच्या महामारीत एका बेवारस महिलेचा स्वखर्चाने अंत्यसंस्कार करून हा ”गृहीत समज” खोटा ठरवून मानवता धर्म पाळला असून पोलीस हेच खरे कोरोना योद्धे असल्याचे समाजाला दाखवून दिले आहे. त्यामुळे पोलीस दलातील समाज बांधवांकडून व पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत महिला रुक्मिणीबाई गोपाळराव वाघमारे ( वय १०० वर्ष, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव नांदेड ) या महिलेचे दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी अडीच वाजता आपल्या सत्तर वर्षे वयाच्या वेडसर मुली सोबत रहात असलेल्या खराबवाडी येथील भाड्याच्या घरात निधन झाले. आणि मयत महिलेच्या मदतीला कोणीच समोर आले नाही, कोरोनाच्या भितीमुळे घर मालकाने पण तोंड फिरवले. पोलीस ठाण्यापर्यंत जाण्यासाठीही तिला कोणी सहकार्य करीत नसल्याने मयत आजीच्या ७० वर्षांच्या वेडसर मुलीने महाळुंगे पोलीस चौकीला पायी जाऊन आपल्या आईच्या निधनाची माहिती पोलिसांना दिली.
येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत बांगर, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. शिवाजी लोखंडे, श्री. राहुल तिवडे यांनी या घटनेबाबत तात्काळ खराबवाडीचे पोलीस पाटील किरण किरते यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सोबत घेऊन सदर मयत महिलेचे दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी बारा वाजता चाकण येथील स्मशानभूमीत स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पोलिसांच्या या मानवता धर्माचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.