गुन्हेगारी

घरफोडीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

 

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे
जुन्नर : जुन्नर उपविभागात गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने एल. सी. बी. पुणे ग्रामीण कडील टीम पेट्रोलिंग करीत असताना घरफोडीतील आरोपीस पकडण्यात यश आले आहे.

जुन्नर पो. स्टे. गु.र.नं. 422/2020 भा. दं. वि. कायदा कलम 457, 380 चा समांतर तपास करताना त्यातील बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा दिलीप नारायण केदार वय-25 वर्षे, रा. पिराचीवाडी-निमदरी ता. जुन्नर, जि. पुणे याने केल्याची माहिती मिळाली.

त्यावरून सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्यासोबतच जुन्नर पो.स्ट. गु. र.नं. 423/2020 भा. द. वि. कायदा कलम 457, 380 मधीलही घरफोडी केल्याचीही कबुली दिल्याने दोन घरफोड्या उघडकीस आल्या आहेत.

आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पो. ना. दीपक साबळे, पो. हवा. शरद बांबळे, स. फौज. दत्तात्रय जगताप, पो. हवालदार शंकर जम, चालक पो.हवा. काशीनाथ राजपुरे, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना. चंद्रकांत जाधव यांचे पथकाने केली.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

12 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

3 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.