राष्ट्रीय

कर्नाटक सरकारचा खेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध..!

महाबुलेटिन न्यूज / प्रतिनीधी
चाकण :
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांवर सातत्याने अन्याय करत असून तेथील सरकारने बेळगाव येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२० रोजी क्रांतिदिनी माणिक चौक चाकण येथे शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा महिला संघटक विजयाताई शिंदे, शिवसेना खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, ग्राहक संरक्षक सेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, किरण गवारे, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, महेश जाधव, माऊली कड, रमेश शिंदे, स्वप्नील बिरदवडे, दत्ता कंद, स्वामी कानपिळे, प्रवीण मुंगसे, अभिजित जाधव, विकास मुंगसे, खेड तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसेना अंगीकृत संघटनांचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
———
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Mar 2026

गुरुवार, १९ मार्च २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 भीषण…

12 hours ago

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

2 days ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

3 days ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

3 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

9 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

9 months ago

This website uses cookies.