महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आळंदी : विजयाबाई नानासाहेब पानमंद ( वय 59 वर्षे ) यांचे दिनांक 28/5/2021 रोजी रात्री 9:45 वाजता आळंदी देवाची येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या नेहमी इच्छा व्यक्त करायच्या की, माझा शेवटचा श्वास मी आळंदीमध्ये घ्यावा…आणि माऊलींनी त्यांची मनोकामना पुर्ण केली…शेवटी एकच सत्य..,”याजसाठी केला होता अट्टहास…शेवटचा दिस गोड व्हावा”…
त्या अंगभूत कलाकार तसेच पारमार्थिक होत्या आणि सुरेल गायन करायच्या विशेष म्हणजे घरी आलेल्या कलाकारांची कला मनोभावे ऐकायच्या व मनापासुन दाद द्यायच्या…खरेतर त्यांच्या संपर्कात आलेले कलाकार त्यांचा खुप आदर करायचे व सतत त्यांना नवनवीन संगीतातल्या गोष्टी ऐकवायचे कारण त्यांना संगीत ऐकायला खुप आवडायचे…त्या संगीतासोबत राजकारणही शुध्द अंतःकरणाने सांभाळत होत्या…
राजकारणात तीन पंचवार्षिक ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास वाखाणण्याजोगा आहे… त्या वाघिणीसारख्या जगल्या आणि शेवटी जाताना दोन्ही हात जावई शमरावांच्या हातात होते….जणूकाही आजपर्यंत माझ्या लेकरांना मी जपले यापुढे तुम्हाला मोठे जावई या नात्याने सांभाळण्याची जबाबदारी देते….कारण पतीचे वयाच्या 45 व्या वर्षी हार्ट अॅटॅकने निधन झाल्यानंतर मुलांना खुप हलाखीच्या परिस्थितीत घडवले…तीन मुली व एक मुलगा यांना मोठ्या कष्टातून संस्कारमय घडवले…आज सर्वच सर्वत्र परिचित आहेत…
महाराष्ट्रातील प्रसिध्द गायिका सौ. ज्योती गोराणे ह्या यांच्याच कन्या आहेत…तसेच सांप्रदायात कलाकार म्हणुन व समाजकारणात सच्चा कार्यकर्ता म्हणुन सर्वत्र परिचित व्यक्तिमत्त्व ह. भ. प. श्री. अमोल पानमंद हे पुत्र आहेत….त्याना तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे…सासुसुध्दा जावयाला आईप्रमाणेच वागवु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शमरावांच्या सासूबाई, ज्यांना घरातील सर्वजण बाई म्हणुन संबोधत असे….
बाई तुम्हाला साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रध्दांजली… 💐💐
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.