आरोग्य

कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण येथील डॉ. घाटकर यांच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल व चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल.. ● पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना.. ● आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जादा बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे दिले होते आदेश..

कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारणी व बिलाला तगादा लावल्याप्रकरणी चाकण येथील डॉ. घाटकर यांच्या क्रिटिकेअर हॉस्पिटल व चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल..
● पुणे जिल्ह्यातील पहिलीच घटना..
● आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जादा बिल आकारणी करणाऱ्या रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे दिले होते आदेश..

महाबुलेटीन न्यूज 
चाकण : कोरोनाच्या (Corona) काळात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशाही परिस्थितीत खासगी हॉस्पिटलकडून (Covid Hospital) रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या घटना वाढल्या आहे. अखेर राज्य सरकारने दणका देत जास्तीचे बिल आकारणी वसूल करणाऱ्या व बिलासाठी तगादा लावणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चाकण येथील (Chakan) क्रिटिकेअर या खासगी हॉस्पिटल आणि त्यांच्या चार डॉक्टरांवर (Doctor) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राज्य सरकारने दराबाबत नियमावली जाहीर केली आहे. पण तरी सुद्धा खासगी रुग्णालयांकडून लाखो रुपयांची लूट सुरूच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयांचे ऑडिट करून, अवाजवी बिल आकारणी केली असल्यास बिल तपासून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

चाकण ( ता.खेड ) येथील क्रीटीकेयर हॉस्पिटलमध्ये (Chakan Criticare Hospital) काही दिवसांपूर्वी विजय पोखरकर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचाराबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने पुष्पा विजय पोखरकर यांना 2 लाख 53 हजार रुपयांचे बिल आकारले होते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम भरण्याबाबत पुष्पा पोखरकर यांनी हॉस्पिटलकडे विचारणा केली, पण हे बिल भरावेच लागेल, असं सांगण्यात आले.

विशेष म्हणजे, शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अवाजवी दर आकारून 2 लाख 53 हजारांची रक्कम रुग्णाला भरण्यास सांगितली होती. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला रक्कम शासकीय नियमाप्रमाणे द्यावी, अशी सूचना करण्यात आली होती. वारंवार सूचना करूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीची दखल घेण्यात आली नाही.

अखेर या प्रकरणी चाकण क्रीटीकेयर हॉस्पिटलला दणका देत संचालक डॉ. राजेश घाटकर आणि डॉ. स्मिता घाटकर यांच्यासह डॉ. राहुल सोनवणे आणि डॉ. सीमा गवळी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील बिलांची तपासणी केली जाणार अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराला चांगलाच झटका बसला आहे.


०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

3 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.