महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : राक्षेवाडी ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील पहिलवान व प्रसिद्ध गाडामालक बबबनराव गेनू राक्षे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते नव्वद वर्षांचे होते. स्वातंत्र्यपूर्व चळवळीत सहभाग नोंदविणारे जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात बबनराव राक्षे यांचा दबदबा होता. 50 व 60 च्या दशकात कुस्ती क्षेत्रात खेड तालुक्यात त्यांचा नावलौकिक होता. एक नावाजलेले संयमी व्यक्तिमत्व असणारे बबनराव राक्षे पूर्वाश्रमीचे गाडामालक होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू चंद्रकांत (भाऊ) राक्षे यांचे ते वडील होत. स्वर्गीय बबनराव राक्षे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर राजगुरुनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.