कोरोना

जुन्नर तालुक्यात आज २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न

तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या झाली ४५१
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून आज रोजी एकूण २५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण निष्पन्न झाले आहेत. आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ४५१ एवढी झाली असून आजपर्यंत १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी ३०७  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या  १२६  एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.
आज जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये २५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. गाव निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
नारायणगाव ३,
वडगाव कांदळी ८,
सांगणोरे १,
येडगाव १,
तेजुर २,
ओतूर १,
आळे १,
उंचखडक १,
पारूंडे १,
शिंदे राळेगण ६,
असे एकूण २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.