लातूर

स्वप्नांना कष्टाचे बळ द्या : पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम

येरोळ येथील अंध विद्यार्थ्याचा सत्कार
महाबुलेटीन न्यूज / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : “कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा” असे आवाहन पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी येरोळ येथे  केले.
येरोळ ता. शिरूरअनंतपाळ येथील जन्माजातच अंध ( दृष्टीहिन ) असलेला विद्यार्थी कु. चैतन्य ओमकार सिंदाळकर हा शासकिय दिंव्यांग समिश्र केंद्र, येरवडा, पुणे येथे वसतिगृहात असुन तो सुभाषचंद्र बोस विद्यालय, येरवडा, पुणे येथे शिक्षणास आहे. तो मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी च्या बोर्ड परिक्षेत तेथील केंद्रातुन प्रथम आला आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणुन शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी त्याच्या घरी जाऊन कु. चैतन्य ओमकार सिंदाळकर या विद्यार्थ्यांचा शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.
“विद्यार्थ्यांची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी आई, वडील विद्यार्थी व शिक्षक यांची आहे. शैक्षणिक क्षेत्रात पुढील  प्रवेशाची प्रक्रिया समजून घ्या. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे ती शोधात आली पाहिजे. त्यातून योग्य ते क्षेत्र निवडलं पाहिजे. वडिलांचे स्वप्न व तुमची महत्वकांक्षा यांची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. मोबाईल मधील इंटरनेटचा वापर  शैक्षणिक प्रगती साठी करा. आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून कष्ट करा. योग्य ती संधी आपल्या पुढ्यात चालत येईल”, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक कदम यांनी केले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष मगेंश पाटील, गोविंद पोतदार, शामराव सिंदाळकर, प्रा. अभय येरोळकर, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, गावातील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.