पुणे जिल्हा

जमिनीला ३०० मीटरची भेग, ग्रामस्थांमध्ये घबराट

जमिनीला ३०० मीटरची भेग, ग्रामस्थांमध्ये घबराट

 

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे
जुन्नर ( दि २५ ) : सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीला जवळपास ३०० मीटर लांबीची भेग पडल्याने जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या भेगेने घरांचे नुकसान झाले असून प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पडलेल्या भेगीमुळे भिवाडे येथील रामशेज तलावास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माळीण सारखी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

भिवाडे बु. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गाव ज्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे, डोंगराळ भागात मोठी भेग पडल्याची घटना शनिवार ( ता. २२ ऑगस्ट ) रोजी घडली होती.

शिवाजी विठ्ठल विरणक यांच्या घरापासून ते नदीपर्यंत अंदाजे ३०० मीटरपर्यंत जमिनीला भेगा पडल्या आहेत. जमीन काही ठिकाणी खचली असून विद्युत खांब तसेच विहिरींचे नुकसान झाले आहे. डोंगराळ भागातील पाणी मुरून पाणी गावात मुरून थेट नदीमध्ये निघत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिवाजी विरणक यांच्या घरकुलाचे तसेच भीमाबाई विरणक यांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे.

तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. दरम्यान शासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी आदिवासी भागातील कार्यकर्ते दत्ता गवारी व विष्णू घोडे यांनी केली आहे.

फोटो : आदिवासी भागातील भिवाडे बुद्रुक येथे जमिनीत पडलेल्या भेगेने घराचे झालेले नुकसान

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.