कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २६ ॲागष्ट २०२० )- दोन शासकीय अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग, संबंधित कार्यालये बंद

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २६ ॲागष्ट २०२० )
खेड तालुक्यात आज तब्बल ५४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या २७२२, आळंदीला आज सर्वाधिक रुग्ण, नगरपरिषद क्षेत्रात २६ तर ग्रामीण भागात २८ रुग्णांची वाढ, दोन शासकीय अधिकाऱ्यांना कोरोना संसर्ग, संबंधित कार्यालये बंद

 

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. २६ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून खेड पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास प्रकल्प खेड नंबर १ कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील एक अधिकारी यांना कोरोना संसर्ग झाल्याने संबंधित कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तालुक्यात २१८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात २६ तर ग्रामीण भागात २८ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २७२२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २६ ) : राजगुरूनगर – ७, चाकण – ७, आळंदी – १२,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २८ ) : खराबवाडी ४, मेदनकरवाडी ३, शेलपिंपळगाव ३, बहुळ २, पिंपळगाव तर्फे चाकण २, निघोजे २, रासे २, तर महाळुंगे इंगळे, भोसे, सोळु, चांदूस, कुरुळी, बिरदवडी, कोयाळी, मिरजेवाडी, बोरदरा, होलेवाडी या १० गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २७२२
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ६९
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४६५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २१८८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – १२
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
————

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.