इंदापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे संपन्न

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : शासन आदेशानुसार लॉकडाऊनमुळे सुमारे चार महिन्यांपासून रखडलेली इंदापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारे आज ( दि.१४ जुलै ) पार पडली. विविध विकासकामांचे विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी स्वीकृत सदस्यपदी दादासाहेब सोनवणे यांची निवड झाल्याचे पीठासन अधिकारी नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी या वेळी जाहीर केले.
गेल्या चार महिन्याच्या कोरोनाच्या काळातील शहरवासियांची घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेधारकांचे भाडे माफ करण्यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशी सूचना नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी मांडली. त्यास सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. सन २०१८ मध्ये इंदापूर तालुक्याची आणेवारी ५० पैश्यापेक्षा कमी होती. त्यामुळे त्यावर्षी इंदापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता. दुष्काळाचा परिणाम शहरातील नागरीकरण व अर्थव्यवस्थेवर देखील होतो, असा दाखला देत कदम यांनी उपरोक्त सूचना मांडली, तिला सर्वांचा पाठिंबा मिळाला.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

13 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

7 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.