पुणे जिल्हा

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा जिजाऊ ब्रिगेडकडून निषेध

 

आरोपींना महिन्याच्या फाशी देण्याची केली मागणी

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा जिजाऊ ब्रिगेडने निषेध केला आहे. आरोपींना एका महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही केली आहे.

या संदर्भात जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे (पूर्व) च्या जिल्हाध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांनी एक पत्रक प्रसिध्दीसाठी दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका निष्पाप मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करुन, मानवतेला काळिमा फासणारे अत्यंत अमानुष कृत्य केले आहे.

दिल्लीत उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या आईवडिलांच्या गैरहजेरीतच पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही अतिशय घृणास्पद घटना आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे, असे या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

पुणे पूर्व जिल्हा जिजाऊ ब्रिगेड या अमानवी घटनेचा जाहीर निषेध करत आहे. या प्रकरणातील आरोपींना एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडची मागणी आहे, असे प्रा.डॉ.जयश्री गटकुळ यांनी प्रसिध्दी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 hours ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

14 hours ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

This website uses cookies.