महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : शहरातील प्रभाग क्र.१ मधील अनेक वर्षांपासूनची ड्रेनेजलाईन समस्या तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनिकेत वाघ यांनी एकाच महिन्यात धडाकेबाज काम करुन सोडवली. पूर्णत्वास गेलेल्या या कामाचे पूजन नगराध्यक्षा अंकिता शहा व तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा या उभयतांच्या हस्ते करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे इंदापूर शहरातील प्रभाग १ मधील मूकबधिर शाळा, पडस्थळ रोड ते शंकर हौसिंग सोसायटीपर्यंतचे ड्रेनेज उघड्यावर होते. डास, उग्र वास यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. ही बाब लक्षात घेवून नगरसेवक अनिकेत वाघ यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला. या कामासाठी त्यांनी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रुपये ४ लाख ६७ हजार २०१ रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला.
एका महिन्यापूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. ते काम पूर्णत्वाकडे गेले. त्यामुळे नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेविका सुवर्णा मखरे, माजी नगरसेवक सुधीर मखरे, नितीन मखरे, सागर गानबोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे, मुकुंद साळुंखे, विकास खिलारे, तुकाराम कांबळे, स्वप्निल मखरे व इतर रहिवासी उपस्थित होते.
—
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.