महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे : राज्याच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येते. या परी- क्षेच्या अभ्यासक्रमात २८ वर्षांनी बदल करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमाशिवाय नवी कार्यपद्धतीही लागू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.
ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा मान्यताप्राप्त विभागीय, जिल्हा ग्रंथालयांमार्फत घेतली जाते. या परीक्षेचा अभ्यासक्रम १९७३, १९८५ आणि १९९६ मध्ये बदलण्यात आला होता. सद्यःस्थितीत ही परीक्षा १९९६ च्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येते. परंतु, काळानुरूप अभ्यासक्रमात सुधारणा करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रंथालय संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या शिफारशी स्वीकारून परीक्षेचा अभ्यासक्रम (मराठी, इंग्रजी), परीक्षेची सर्वसाधारण कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधारित अभ्यासक्रम आणि सुधारित कार्यपद्धती २०२५ पासून लागू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुधारित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा कालावधी १ ते १० जून बदलून २१ ते ३० जून करण्यात आला आहे. अनुत्तीर्ण उमेदवारांना कमाल तीन संधी दिल्या जाणार आहेत.
* नव्या अभ्यासक्रमात काय..?
नव्या अभ्यासक्रमात ग्रंथालय आणि समाज, ग्रंथालय व्यवस्थापन, वर्गीकरण आणि तालिकीकरण, माहिती, साधने आणि सेवा, ग्रंथालय तंत्रज्ञान, कार्यानुभव आणि प्रकल्प या घटकांचा समावेश आहे.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.