महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
चाकण : पुणे जिल्ह्यात आगाऊ येऊ घातलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नेमणुका करण्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी हरकत घेतली असून याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्राच्या प्रति त्यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविल्या आहेत. विद्यमान सरपंचांना प्रशासकपदी नियुक्ती करण्याची त्यांनी मागणी केली असून प्रशासक नेमणुकीचे पालक मंत्र्यांना अधिकार दिल्यास त्यांच्या पक्षातील व्यक्तींनाच संधी देऊन मनमानी कारभार होईल, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ बारा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून त्यापैकी पुणे जिल्ह्यात जवळपास साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. परंतु त्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या होऊ शकत नसल्याने त्यावर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याबाबत राज्य शासनाने ठरविले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर प्रशासक नेमण्याचे अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे समजते. जर पालकमंत्र्यांना असे अधिकार दिले तर ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावू शकतील. त्यामुळे चालू असलेला विकासकामांचा गाडा थांबणार आहे. अपात्र व्यक्ती देखील त्यापदावर येऊ शकतील व मनमानी कारभार होण्याची शक्यता आहे. हि बाब लोकशाहीला धरून नाही. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींवर जे विद्यमान सरपंच कार्यरत आहेत, त्यांना किंवा प्रशासनातील योग्य व्यक्तीला ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात यावे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.