सरपंच दत्ताजी को गुस्सा क्यूँ आता है…..

महाबुलेटिन नेटवर्क
मंचर: कोरोना योध्याचे काम मंचरचे प्रथम नागरिक दत्ता गांजाळे पहिल्यापासून युद्ध पातळीवर करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे आणि योगदानाचे कौतुक दस्तुरखुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. मात्र तुटपुंज्या वैद्यकीय सुविधेबाबत त्यांनी एक व्हिडिओद्वारे स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
        मंचरकरांच्या आरोग्यावर वैद्यकीय सेवांअभावी टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत आवश्यक असून  त्यासाठी सुसज्ज दवाखाना अत्यंत आवश्यक असल्याची गरज सरपंच दत्ता  गांजाळे यांनी व्यक्त केली. कोरोना महामारीच्या काळात राजकारण  न करता सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मंचर  उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका चंदराणी पाटील यांनी  मंचर रुग्णालयातील आय. सी.यु वार्डाची  सुधारणा करून कोरोनाग्रस्तांसाठी वार्डाची सोय करावी. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येईल त्यांच्यासाठी विलगीकरण कक्षाची व्यवस्था करून त्यांची तपासणी करण्यासाठी असणारी यंत्रणा त्यासाठी लागणारे टेक्निशियनची व्यवस्था करावी. आजारी व्यक्तींवर वेळेवर उपचार करण्यात यावे तसेच मंचर हे शेतीप्रधान गाव असून  येथे सर्पदंशचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारण असून रुग्णालयात सर्पदंशाची लस उपलब्ध  करण्यात यावी. गरजूंना याचा लाभ घेता येईल अशा रास्त मागण्या सरपंच दत्ता गांजाळे यांनी मांडल्या.  यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच मंचर ग्रामीण रुग्णालयातील असुविधेबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
पहा व्हिडिओ : दत्ता गांजाळे यांनी व्यक्त केलीली नाराजी
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.