सण-उत्सव

गणेश मुर्ती उंचीच्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा : सतीश दरेकर

कुंभार समाजीची कुटुंबे उध्वस्त करणारा शासन निर्णय
महाबुलेटीन नेटवर्क / वैभव हन्नुरकर
पिंपरी-चिंचवड : राज्य शासनाने गणेश मुर्तीच्या उंची संदर्भात घेतलेला मार्गदर्शक सुचना निर्णय राज्यातील कुंभार समाजाला उध्वस्त करणार ठरणार आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसदस्य सतिश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केले आहे.
राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेश मुर्तींची उंची चार फुट, तर घरगुती गणेशोत्सवाच्या गणेश मुर्तींची उंची दोन फुट ठेवावी असे आदेश काढले आहेत. या संदर्भातील आदेश गृह विभागाचे प्रधान सचिव ( विशेष ) यांनी पारित केला आहे.
सतीश दरेकर

या संदर्भात सतीश दरेकर म्हणाले की, “महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाचे प्रधान सचिव ( विशेष ) अमिताभ गुप्ता यांनी 11 जुलै 2020 रोजी आदेश क्र. – आरएलपी- 0620/प्र.क्रं.90/विशा 1 परित केला आहे. त्यातील क्र. तीनच्या मुद्यामध्ये गणेश मुर्तीच्या उंचीबाबतचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या या आदेशाला उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने कुंभार समाज उत्सवाच्या आधी आठ ते दहा महिने मुर्ती तयार करण्याचे काम करत असतात. यासाठी मुर्तीकार मोठ्या प्रमाणात कर्जे घेत असतात. सद्य स्थितीत कोरोनामुळे कुंभार समाज आधिच मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या गणेश मुर्तींच्या या आदेशामुळे तयार केलेल्या मुर्ती विकल्या जाणार नाहीत व राज्यातील कुंभार समाज मोठ्या अर्थिक संकटात सापडून पूर्णतः उध्वस्त होईल, यामुळे या मार्गदर्शक सुचना निर्णयातील क्र. तीनच्या मुद्याचा शासनाने फेरविचार करावा व क्र. 3 ची अंमलबजावणी या वर्षी करु नये”, अशी विनंती शासनाला केली आहे.

या संदर्भात सतिश दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व गृहविभागाचे प्रधान सचिव ( विशेष ) अमिताभ गुप्ता यांना पत्र पाठवून निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी विनंती केली आहे.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.