खेड

एका उत्कृष्ट, कणखर, शिस्तप्रिय, खेळाडू अशा व्यक्तिमत्वाचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न…

महाबुलेटीन न्यूज / हनुमंत देवकर
चाकण : पोलीस विभाग म्हंटले की, आपल्या मनात एक संकोचीत भावना निर्माण होते त्या वर्धिकडे एका वेगळ्या तिरकस नजरेने बघितले जाते. पण समाज्यात असे अनेक घटक आहेत की त्यात एका व्यक्तीमुळे सर्व विभाग किंवा घटक बदनाम केला जातो. पण याच पोलीस विभागात असेही काही कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत की त्यांनी आपली पूर्ण सेवा निष्कलंकी करून विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज अशाच व्यक्तिमह्त्वा बद्दल त्यांच्या सेवा निवृत्त सोहळ्याच्या निमित्ताने लिहीत आहोत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खेड शिवापूर या गावात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात १८ जुलै १९६२ रोजी दिलीप नारायण कोंडे-देशमुख यांचा जन्म झाला. पहिल्या पासूनच मेहनती शरीर असल्याने आणि घरातच पोलिसी वातावरण असल्याने आपले शिक्षण करता करता आणि एक उत्तम खेळाडू म्हणून वयाच्या २१ व्या वर्षी बारामती येथे पोलीस विभागात भरती झाले.
घरातील वातावरण पोलिसी आणि स्वतः पोलीस विभागात भरती झाल्याने त्यावेळी समाज्यामध्ये कमी दिवसातच मोठी प्रतिष्ठा निर्माण केली. घरात ३ भाऊ आणि एक लाडकी बहीण असा परिवार पण घरातीक  शिस्तप्रिय वातावरण असल्यामुळे  इतर काही करण्यापेक्षा आपल्या पोलीस विभागाचे काम एकनिष्ट आणि प्रामाणिक करण्याची सवय जशी अंगवळणीच पडून गेली होती.
पोलीस विभागात काम करताना त्यांना घरच्या कडक सिस्थिचा तंतोतंत उपयोग झाला. अनेक ठिकाणी नोकरी करूनही कुठे आपल्या नावाला व आपल्या वर्धिला कुठे गाल बोट लागणार नाही याची नेहमी त्यांनी काळजी घेतली.
दिलीप कोंडे-देशमुख यांना पोलिस विभागात कामाचा आलेख नेहमी उंचच राहिला आहे. कोणत्याही त्यांच्या खाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला विचारा पण कधी साहेब असे आहेत किंवा तसे आहेत असे कुणी कधी बोलल्याने अजून तरी कुणी पाहिले नाही. कामात कधी कुचराई किंवा दिरंगाई त्यांना आवडत नसे.
कोंडे-देशमुख यांचा त्यांच्या पोलीस विभागाच्या व्यतिरिक्तही ज्या ठिकाणी नोकरी केली ठिकाणच्या राजकीय,सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांशी अतिशय सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्यांचा मित्रपरिवारही अतिशय मोठा असल्याने आजच्या त्यांच्या निरोप समारंभाला कोरोनामुळे जे त्यांचे स्नेही, मित्र येऊ शकले नाही त्यांनी त्यांना आवर्जून मोबाईल, व्हाट्सअप्प आदीच्या माध्यमातून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या..
दिलीप कोंडे-देशमुख यांचे एका बाबतीत कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ते एक खेळाडू असल्याने त्यांनी पोलीस विभाग आणि खेळाडू याची कधीही नाळ तुटून दिली नाही. त्यामुळे पोलिस विभागाकडून कोणत्याही क्रीडा स्पर्धा असतील त्यात त्यांचा उत्कृष्ट सहभागच नाही तर उत्कृष्ट कामगिरीही असल्याचे प्रखर्षाने जाणवत आहे. आत्ताच या वर्षात महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेतही दिलीप कोंडे देशमुख यांनी नेतृत्व करून दैदिप्यमान कामगिरी बजावली होती. महत्वाचे म्हणजे आता कोरोना महामारी आली म्हणून नाहितर त्यांची ब्राझील येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी बास्केटबॉल स्पर्धेसाठी भारताच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
यांन त्या प्रत्येक स्पर्धेत दिलीप कोंडे- देशमुख आपले कर्तव्य बजावत आहेत. आज त्यांचा पोलिस सेवेतील पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवा निवृत्ती झाली. त्यामुळे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाला सदैव अशा एका उत्कृष्ट, कणखर, शिस्तप्रिय, खेळाडू अशा व्यक्तिमह्त्वाची उणीव भासत राहील यात तिळमात्र शंका नाही. आज पोलीस उपनिरीक्षक दिलीप कोंडे – देशमुख यांना ते कर्तव्यास असलेल्या चाकण वाहतूक विभागाचे अतिशय आदर पूर्वक सेवानिवृत्ती सोहळा साजरा केला. यावेळी कोंडे-देशमुख यांच्या पत्नी, त्यांचे भाऊ, पुतणे, बहीण त्याच बरोबर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना आदरपूर्वक निरोप दिला.
या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी चाकण वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे, पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे, हवालदार नवनाथ पिंगळे, वाळुंज, स्वप्नील दौंडकर, अनिल राक्षे, अरुण साबळे, हवालदार स्मिता गाढवे, देशमुख मॅडम व सर्व कर्मचारी, वॉर्डन यांनी परिश्रम घेतले आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप कोंडे-देशमुख यांना आदर पूर्वक निरोप दिला. यावेळी कोंडे -देशमुख यांनी माझ्या सर्व पोलीस सेवेत चाकण वाहतूक विभागा सारखे कर्मचारी व अधिकारी भेटले नसल्याची भावना बोलून दाखवली..
साहेब शेवटी एकच..
————————
आपण सेवानिवृत्त होताय,
आमचा निरोप घेताय हे अगदी खरं..!
पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र,
सदैव अबाधितच राहील…!
तुमच्या सहवासात घालवलेले
अनेक क्षण आजही आम्हाला आठवत राहतील..
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं,
आम्हाला सतत सदैव आठवतच राहील..
तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच
सुखसमाधानाचं जावो हि आमच्या कडून मनःपूर्वक प्रार्थना..!
अशा शुभेच्छा चाकण परिसरातील मित्र परिवाराने त्यांना दिल्या.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.