कोरोना

आंबेगाव तालुक्यातील कोविडसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे ५०० मास्कचे वाटप

महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
घोडेगाव : देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर चालू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन तसेच इतर विभागातील पदाधिकारी व कर्मचारी आहोरात्र आपली सेवा बजावत आहेत. ही बाब नक्कीच अभिनंदनीय अशीच आहे. त्यामुळेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व जनतेची बांधिलकी म्हणून नुकतेच आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कापडी मास्क वितरित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.
रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने व श्रीमती कांताताई नाईक यांच्या पुढाकाराने आदिम संस्था आणि किसान सभा यांनी या उपक्रमाचे स्थानिक संयोजन केले होते. घोडेगाव, ता.आंबेगाव येथील पोलिस स्टेशन येथील पोलीस बांधव, वीज विभागातील कर्मचारी, कृषी विभागातील कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे कापडी मास्क वितरित करण्यात आले. या उपक्रमाचे स्थानिक संयोजन डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, अशोक पेकारी, अशोक जोशी, अनिल गाडेकर व समीर गारे यांनी केले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.