निधन वार्ता

एका तासाच्या अंतराने बहिण-भावांनी घेतला जगाचा निरोप

 

एका तासाच्या अंतराने बहिण भावांनी घेतला जगाचा निरोप

महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : एकाच आईच्या उदरी जन्मलेल्या, एकाच गावात उभे आयुष्य काढलेल्या बहिण-भावांचा अंतही एका तासाच्या अंतराने झाला. त्यांचा अंत्यविधीही एकाचवेळी झाला. कालठण नं.१ ( ता.इंदापूर ) येथे आज ( दि.२२ ऑगस्ट ) रोजी ही ह्रदयद्रावक घटना घडली.

येसूबाई सपकळ या वयाची शंभरी पार केलेल्या आपल्या आजारी बहिणीला भेटण्यासाठी त्यांचे लहान बंधु रामदास चोरगे (वय ९७ वर्षे) हे काल त्यांच्या घरी गेले होते. प्रकृतीची विचारपूस करुन हे बहिण-भाऊ काही काळ भूतकाळात रमले.

आज दुपारी रामदास चोरगे यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाभरात येसूबाई सपकळ यांनी ही जगाचा निरोप घेतला. शेवटच्या क्षणापर्यंत अतूट राहिलेल्या त्यांच्या नात्याच्या दर्शनाने तमाम कालठणकरांचे डोळे पाणावले.

श्रीमती येसूबाई सपकळ यांना सहा महिन्यांपूर्वी भेट घेऊन लाभलेल्या दिर्घायुष्याचे रहस्य समजून घेतले त्यावेळी रोटरी क्लब पुणे येथील पदाधिकारी उपस्थित होते.

—–

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Oct 2026

गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिवेआगर…

18 hours ago

MahaBulletin — 22 Oct 2026

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

4 days ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

5 days ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

6 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

2 weeks ago

This website uses cookies.