महाबुलेटीन न्यूज
चाकण : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करताना गरजूंना आधार देण्यासाठी व कोरोना योध्दयांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपणही समाजाचं काही देणं लागतं या भावनेतून दुर्गाई हृदय प्रतिष्ठानचे संस्थापक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी मामा शिंदे यांच्या प्रेरणेतून गरजू कामगार व निराधार महिलांना अन्नधान्य किट, सॅनिटायझर बाॅटल व N95 मास्कचे वाटप तसेच चाकण बाजारपेठ मध्ये हायपोक्लोराईड फवारणी दुर्गाई हृदय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली. चाकण पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, शेलपिंपळगाव तसेच चाकण ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी, नर्स, डाॅक्टर यांनाही एन 95 मास्क व सॅनिटायझर बाॅटलचे वाटप करण्यात आले, अशी माहिती सचिव राजेंद्र शिंदे यांनी दिली.
यावेळी दुर्गाई प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, किशोर जगनाडे, प्रशांत गोलांडे, अंकुश डोंगरे, किरण शेटे, अनिल जगनाडे, रामदास जाधव, राजेंद्र जगनाडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सुभाष शिंदे, उमेश आगरकर, संजय शिंदे, राजेंद्र शिंदे, रामदास जाधव यांनी विचार व्यक्त केले. कामगारांच्या वतीने संजय पाटसकर यांनी आभार मानले.
शेलपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यधिकारी डाॅ. इंदिरा पारखे तसेच चाकण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. ढवळे यांनीही मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
मागील वर्षीही पहिल्या लाटेवेळी प्रतिष्ठानच्या वतीने इनलॅक्स बुधरानी हाॅस्पीटलला पन्नास पीपीई कीट्स तसेच चाकण ग्रामीण रुग्णालय, म्हाडा कोविड सेंटरला पीपीई कीट्स, मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर बाॅटलचे वाटप करण्यात आले होते, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शामराव पवार व दत्तात्रय भेगडे यांनी सांगितले.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.