नागरी समस्या

आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकारातून पाणी प्रश्न समस्यांबाबत पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक

आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकारातून पाणी प्रश्न समस्यांबाबत पुणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक  : राजेंद्र खांदवे यांची माहिती

महाबुलेटीन न्यूज
लोहगाव : आमदार सुनील टिंगरे यांच्या पुढाकारातून लोहगाव येथील पोरवाल रोड, अपार्टमेंट व इतर सोसायट्या मधील पाणी प्रश्न समस्या बाबत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी आज दि. 20 मे 2021 रोजी एक बैठक झाली.

यावेळी सर्व ठिकाणी मुबलक पाणी देण्याविषयी व नियोजनासाठी चर्चा झाली व भविष्यात पाणी नलिका टाकणे, पाण्याची टाकी तयार करणे, जास्त वेळ पंपिंग करण्याचे ठरले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, सहआयुक्त श्रीमती. रूबेला अगरवाल, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, उप अभियंता मधुकर थोरात, भामा आसखेड पाणी प्रकल्पाचे उप अभियंता विजय हवालदार, दत्तात्रय तांबारे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, माजी उपसरपंच नवनाथ मोझे, माजी सभापती अशोक बाप्पू खांदवे, माजी उपसभापती बंडू खांदवे, डॉ. राजेश साठे, शरद खांदवे, राहुल टेकवडे, रवी टिंगरे आदी उपस्थित होते.

यावेळी पोरवाल रोड, तेथील सोसायट्या, अपार्टमेंट तसेच डी. वाय. पाटील रोड साठी 7.5km लांबीच्या 12 इंच व्यासाच्या मोठ्या पाईप लाईन बसविणे, त्या ठिकाणी त्या भागातील लोकांसाठी भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी ज्यादा क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधणे आदी कामे करण्याबाबत आमदार सुनिल टिंगरे यांनी सुचविले. तोपर्यंत त्या भागाला पाणी मिळण्यासाठी मुख्य लाईन मधून बूस्टर टाकून त्या भागात पाणी देणे, हरन तळे येथील पाण्याच्या टाकीचे काम जलद गतीने करून घेणे, 24×7 या योजनेतून ग्रॅव्हिटी लेवलने पाणी देणे असेही सुचविले. त्यावर मनपा अधिकाऱ्यांनी सर्वे करून लगेचच पाणीपुरवठा कसा देता येईल यावर चर्चा केली व लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवू, असे आयुक्त यांनी सांगितले.
०००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.