दुनिया अनमोल रत्नांची : मोती

आपल्याला अनेकदा असं सांगितले जाते, हे रत्न वापरा.फरक पडेल! परीक्षेत यश मिळेल! लग्न जुळेल!नोकरी मिळेल!इ.इ. पण खरंच असं होतं का ?
                   तर उत्तर आहे हो ! असं होतं.कोणत्याही रत्नात एक उर्जा असते.ती एक तर पाँझीटीव्ह असते अथवा निगेटिव्ह असते पण उर्जा असते.काही रत्न जैविक परिणाम साधतात.तर काही मानसिक. ( उदा.पोवळे वापरल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.तर मोती वापरल्याने चिडचिडेपणा कमी होतो.) अशा रत्नांच्या बद्दल आपली माहिती अतिशय नगण्य असते.म्हणून विविध रत्ने, त्यांचा उपयोग, ती का वापरावी अथवा का वापरु नये.रत्ने ओळखावी कशी अशा प्रकारची सर्व माहिती एक लेखमालेतून आपणासमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. रत्नांच्या किमती.व त्याचा परतावा याबाबत देखिल आपल्यामध्ये फार संभ्रम असतात. बरेच वेळा आपण फसवले जाऊ या भीतीने रत्नखरेदी देखील टाळतात लोक. पण जर रत्न खरेदीची जुजबी माहीती जरी आपल्याला असली तरी फसवणूक टाळली जाऊ शकते.आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच!
मोती……..
आज मोती या रत्नाबद्दल बोलुया आपण.मोती हा चंद्र ग्रहाच्या अधिपत्याखाली येणारं रत्न आहे.संस्कृत मध्ये मोत्याला शक्तीज,इंद्ररत्न,मुक्ता असं म्हणतात तर इंग्रजी मध्ये पर्ल असे म्हणतात.मोती या रत्नाचा उल्लेख अगदी ऋग्वेदात आढळून येतो.
       मोत्याची उत्पत्ती शिंपल्यातून होते.हल्ली मोत्यांची शेती देखील केली जाते.असं म्हणतात स्वाती नक्षत्रात सर्वाधिक मोती तयार होतात.शुभ्र,गुलाबी आणि काळा या तीन रंगात मोती पहायला मिळतात.मोत्यांचे वेगवेगळे प्रकार देखील आहेत.खाका मोती,बसरा मोती,कल्चर्ड मोती,सेमी कल्चर्ड मोती,( कल्चर्ड आणि सेमी कल्चर्ड मोती दागिन्यांसाठी वापरले जातात कारवार बेळगाव कडे )वेनेज्युअला मोती असे विवीध प्रकार असतात.हल्ली बाजारात चायना मोती देखील मिळतात हं.( चायना सगळ्या प्रकारचे रत्न बनवतात आणि ते नँचरल रत्नांइतकेच दिसतात. ) जगभरातील विविध खाड्यांमध्ये मोती मिळतात.पण बसरा येथील मोती सर्वोत्तम मानले जातात. क्रुत्रीम मोती चायनामध्ये सर्वाधिक प्रमाणात बनवले जातात आणि ते स्वस्त ही असतात साधारणपणे १००₹ पासून हे विकले जातात.
खरा मोती ओळखावा कसा? काचेच्या भांड्यात मोती ठेवावा त्यावर प्रकाश टाकून पहावा मोत्याच्या रंगाच्या छटा परावर्तीत झाल्या तर तो खरा मोती. चायना मोतीच्या अशा छटा परावर्तीत होत नाहीत. जर समजा यात कळले नाही तर रात्रभर मोती गोमुत्रात भिजत ठेवावा विघटन झाले तर मोती खोटा आहे ना सोपे…….!
                 मला नेहमी एक प्रश्न विचारला जातो कसा मोती घ्यावा.? दोषविरहीत मोती असावा ठिपके असलेला, बेडोल, काळपट, असे मोती वापरु नये. एकवेळ मोती घेऊ शकत नसाल तर निमरु नावाचे रत्न वापरावे किंवा चंद्रमणी वापरावा पण खोटा मोती घालू नये कारण ज्या साठी आपण मोती घेतो ते कारण साध्य होत नाही. मोती का वापरावा मोत्याचे फायदे काय असतात हे अनेकदा आपल्याला माहीती नसते.
           मोती धारण केल्याने, मनाची विशालता वाढीस लागते.कल्पनाशक्तीस चालना मिळते. कवि, लेखक, व्यावसायिक, चित्रकार, संगीतकार हि मंडळी प्रामुख्यानं मोती वापरताना दिसतात.तापट स्वभावाच्या व्यक्तीस मोती फारच लाभदायक असतो.निर्णयक्षमतेचा अभाव असणारांनीही मोती वापरावा.वारंवार सर्दी पडसेचा आजार असणारांनी मोती वापरू नये शितप्रव्रुत्ती असते ना मोत्याची.उष्णता आणि कँल्शीअमचा अभाव असणारांनी मोती वापरावा. लहान मुलांच्या मनगटी मध्ये मोती पोवळे यासाठीच घातले जात असे. हल्ली मनगटीत काळा मणी वापरतात.पण खरेअर्थी मोती पोवळे आणि काळा मनी अशा स्वरूपातच मनगटी बनवावी.मोत्याचे भस्म औषधासाठी वापरले जाते. असा हा बहुगुणी मोती. पारखून घेतला तर फायदाच फायदा करुन देतो.आध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही ज्यात सामावले आहेत. तेव्हा  मोती खरेदी करताना प्रमाणपत्राची मागणी करा. कारण चांगला मोती मिळाला नाही तर चांगला लाभ होणार नाही.[Advt]
गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
९८२२७९९८९८
९६५७३२२१०२
admin

Share
Published by
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.