दुनिया अनमोल रत्नांची : सुर्यासम तेज लाभलेला माणिक

नमस्कार,
मागील लेखात आपण पाचू रत्नाबद्दल माहिती जाणून घेतली.त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आणि फोन देखील आले.काहिंनी शंका देखील विचारल्या. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
             आज आपण माणिक या रत्नाबद्दल माहिती करुन घेऊ. रंग,रुप आणि मुल्य यांची माणकासोबत  बरोबरी कुणीही करु शकत नाही. म्हणूनच माणकाला नवरत्नाचा राजा असे संबोधतात. रक्तवर्णापासून ते गुलाबी रंगापर्यंत माणकाच्या विविध छटा असतात.आमच्या रत्नशास्त्राच्या भाषेत “पीजनब्लड”  ( कबुतराच्या रक्ताच्या रंगाप्रमाणे) कलरचे रूबी सर्वात महाग असतात.सर्वाधिक चांगले माणिक बरमा देशात मिळतात. यात न्यु बर्मीज फारच प्रसिद्ध आहेत.अँल्युमिनीयम आँक्साईड आणि कोरंडम या खनिजाचे परावर्तित रुप म्हणजे माणिक होय.माणकाला जो लाल रंग प्राप्त होतो तो,अँल्युमिनीयम आँक्साईडमध्ये असलेल्या क्रोमिअम या द्रव्यामुळे येतो.लँटिन भाषेत रुवर म्हणजे लाल रंग.आणि म्हणूनच माणकाला इंग्रजी मध्ये रुबी असे म्हणतात.
           जगभरात मँनमार,रशिया, भारत, आँस्ट्रेलिया,थायलंड,व्हियतनाम,नाँर्वे येथे देखील चांगले माणिक मिळतात. हल्ली बाजारात क्रुत्रीम माणिक देखील मिळतात. असे माणिक बँकाँक येथील असतात. साधारत: १०० ते २०० रुपये प्रतिकँरेट अशा रत्नाचा भाव असतो.पण अशा माणकांत नैसर्गिक गुण असत नाहीत.त्यामुळे अशा रत्नांचा अँस्ट्रोलाँजिकली काहीच उपयोग होत नाही. शुध्द लाल रंगाचा माणिक बाजारात सापडणे खरेतर विरळच मानला जातो.नैसर्गिक रत्नात झिरीम आणि बबल्स असणं महत्त्वाचे. असे झिरीम आणि बबल नसलेले लाल रत्न माणिक असूच शकत नाही.
माणिक कसा ओळखावा :
काचेच्या तुकड्यांप्रमाणे कठोर पण गुळगुळीत पृष्ठभागावर माणिक स्क्रॅच (घासा) करा.जर पृष्ठभागावर लाल रंगाची एक रेष मागे राहिली असेल तर हे स्पष्ट आहे की आपला माणिक बनावट आहे.वास्तविक माणिक अशा प्रकारे कधीही रंग सोडणार नाही.
                  माणिक धारण केल्यानंतर काय फायदे होतात हे आपण पाहूया. मनाची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी माणिक धारण करावा.ज्योतिषशास्त्र मध्ये माणकाला सुर्याचे प्रतीक मानतात.ज्ञान, सत्ता, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा ग्रह म्हणजे सुर्य आणि सुर्याचे प्रतीक म्हणजे माणिक. आणि म्हणूनच महत्वकांक्षी व्यक्तींना माणिक वापरण्याचा सल्ला ज्योतीषशास्त्री देतात.तेजपुंज आणि प्रसन्न चेहऱ्यासाठी माणिक वापरावा.माणकाच्या वापराने त्वचाविकार नाहीसे होण्यास मदत होते असं आयुर्वेदात सांगितले आहे.
                   असा तेजपुंज माणिक वापरुन पहा,नक्कीच फायदा होईल(  ज्योतिष सल्ल्यानुसार).
श्री गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरूनगर
९६५७३२२१०२
९८२२७९९८९८
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.