वैचारिक निबंध लेखन स्पर्धेत डॉ.श्रुती गुजराथी प्रथम

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरुनगर : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित वैचारिक निबंध लेखन स्पर्धेचे तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस येथील डॉ. श्रुती श्रीकांत गुजराथी यांना जाहीर झाले आहे. अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोरोणा नंतरचे होणारे संभाव्य बदल याविषयी वैचारिक निबंध स्पर्धा आयोजित केली होती.
     कोरोना सारख्या महामारी मुळे जागतिक स्तरावर आव्हानात्मक पर्व सुरू झाले असून, त्याप्रमाणे देश-विदेशात कोणकोणते बदल घडून येतील? तसेच आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या जगण्यात कोणते बदल असतील? आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत?  एक सजग नागरिक म्हणून आपल्या आवडीच्या, अभ्यासाच्या, अनुभवाच्या अशा कोणत्याही क्षेत्राविषयी किमान पंधराशे शब्दात वैचारिक स्वरूपाचा निबंध पाठविण्याचे आवाहन गारटकर यांनी केले होते. त्यानुसार डॉ. गुजराथी यांनी आपले निबंध लेखन गुगलफॉर्म वर पाठवले होते. या स्पर्धेत डॉ. गुजराथी यांना तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे व उत्तेजनार्थ जिल्हास्तरीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.