जिज्ञासा

दुनिया अनमोल रत्नांची : उष्ण रंगाचे प्रतीक ‘गोमेद’

नमस्कार,
आज आपण गोमेद या रत्नासंदर्भात माहिती घेऊ. गोमेदला इंग्रजी मध्ये हेसोनाइट म्हणतात.तर संस्कृत मध्ये तपोमणी,पिंगास्पटीक,त्राणवार, असे म्हणतात. गोमेदचा उल्लेख आयुर्वेदात आढळतो.किंबहूना या रत्नास हजारो वर्षाची परंपरा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. गोमेद प्रामुख्याने श्रीलंका आणि द.अफ्रिका या देशात आढळतात.चांगले गोमेद श्रीलंकेचे समजले जातात.हल्ली बाजारात बँकाँकचे गोमेदही आहेत.पण त्यात रासायनिक संयुगे आणि खनिजांचा आभाव आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.अशी रत्ने बाजारात अगदी सहज उपलब्ध होत असली तरी ती प्रभावशुन्य असतात हेच खरे.
              गार्नेट या खनिजगटातील हे रत्न आहे.याचे रासायनिक सुत्र आहे. x3y2( s1o4)3कँल्शीअम आणि अँल्युमिनीअम चे सिलीकेट म्हणजे गोमेद होय.आजच्या लेखासोबत मी दोन छायाचित्रे प्रसिद्ध करणार आहे.एक अनफाँर्म स्टोनचे ( न पैलू पाडलेला ) आणि फाँर्म स्टोनचा.यातील फरक वाचकांच्या लक्षात यावा यासाठी.गोमेदमध्ये लोह आणि मँग्नेशीयम चे अंश देखील आढळतात. गोमेद हे रत्न पारदर्शक असते.मध,गोमुत्र, आणि तप्तनिखारा या रंगांसारखा गोमेदचा रंग असतो.कदाचित म्हणूनच संस्कृत मध्ये गोमेदला तपोमणी म्हणत असावेत.
      काठीण्य आणि वजनदारपणा हे गोमेदचे आणखी दोन वैशिष्ट्य आहेत. चांगला गोमेद ओळखावा कसा ? गोमेद हातात घेतल्यानंतर त्याची उष्णता आपोआप जाणवू लागते. पारदर्शकता ही गोमेदची दुसरी ओळख. पण गोमेदची खरी परीक्षा पहायची असेल तर तो रात्रभर गोमुत्रात भिजत ठेवावा.जर गोमुत्राचा रंग बदलला तर समजावे रत्न वापरण्यास उत्तम आहे. आमच्या व्यावसायातील एक आमचे स्नेही गमतीत म्हणतात.गोमुत्राचा रंग लाभलाय म्हणूनच या रत्नास गोमेद म्हणत असावेत.
      गोमेद कुणी वापरावा ? शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणारांनी, पांढरे पेशी कमी असणारांनी, हडांचे विकार असणारांनी,त्वचा विकार असणारांनी गोमेद वापरावा.आयुर्वेदानुसार अशा व्यक्तींवर गोमेद रत्नाचा विषेश प्रभाव पडत़ो.आणि त्याची मदत होते. मानसशास्त्रीय आकलनात असे दिसून आलेय की, मनशांती चा आभाव असणारांनी व सकारात्मक उर्जेचा आभाव असणारांनी गोमेद वापरून पहावा.
       गोमेद राहूच्या अधिपत्याखाली येणारं रत्न आहे.त्यामुळे ज्योतिषशास्रावर विश्वास असणारांनी शक्यतो गुरुजींसोबत चर्चा करुनच गोमेद वापरावा असं मी नेहमी सांगतो.
गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरूनगर
९६५७३२२१०२
९८२२७९९८९८
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.