कोरोना

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : चाकण एमआयडीसीत ‘या’ कंपनीत आढळले १२० कामगार पॉझिटिव्ह

समूह संक्रमनाची मोठी सुरुवात, एकाच दिवसाचा खेड तालुक्यातील उच्चांकी आकडा
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : खेड तालुक्यात आता कंपनी कनेक्शनमधून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून, चाकण एमआयडीसीतील म्हाळुंगे गावाच्या हद्दीतील लेअर कंपनीत १२० जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. या घटनेमुळे कंपनीचे, कामगारांचे, प्रशासनाचे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील एकाच कंपनीत एकाच दिवशी १२० जण बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातील ६० ते ७० जण खेड तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान आज ( शनिवारी ) सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. कंपनीतील ८०० लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी १२० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर समूह संक्रमनाची सुरुवात झाली आहे.
या कंपनीत सापडलेल्या १२० रुग्णांपैकी खेड तालुक्यातील किती रुग्ण आहेत, याचे सर्व्हेक्षण सुरू केले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
मागील तीन दिवसांपासून प्रशासनाची समिती या कंपनीत पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने सर्व्हे साठी जात होती, पण कंपनी व्यवस्थापन माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती, असे म्हाळुंगे कोरोना स्थानिक समितीने सांगितले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

19 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

7 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.