सण-उत्सव

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या

सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहपयोगी वस्तू  व वाहनांचे बुकिंग करण्याकडे ग्राहकांचा कल

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : सर्वत्र नवदुर्गेच्या भक्तीचा जागर सुरू असून सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पहावयास मिळत आहे. देवीच्या या नवरात्रोत्सवाचा उत्साह बाजारपेठांमध्येही पसरला आहे. सोने-चांदीचे दागिने, घरगुती वापराचे साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू बरोबर, वाहनांचेही आगाऊ बुकिंगही होताना दिसत आहे. बहुतांश प्रत्यक्ष खरेदीसाठी अनेकजण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कोरोनाचे भीतीयुक्त दुःख व निराशेचे सावट दूर करत नवरात्रौत्सवाबरोबर आदिशक्तीच्या भक्तीचा जागर सर्वत्र सुरू झाला आहे. देवीच्या उपासनेने वातावरणात सर्वत्र उत्साह संचारला आहे. कोरोना महामारीचा संसर्ग आणि लॉकडाऊन मुळे उद्योग व्यवसाय व बाजारपेठांवर पसरलेली शोककळा नवरात्रोत्सवामुळे दूर झालेली आहे. सर्वच क्षेत्रातील लॉकडाऊनचे निर्बंध उठल्याने सर्व प्रकारच्या बाजारपेठा अनलॉक झाल्या आहेत. ठरावीक वेळेची बंधनेही शिथिल झाल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत बाजारपेठा खुल्या दिसत आहेत. त्यामुळे सणा-सुदीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडू लागले आहेत.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्ताकडे पहिले जाते. या मुहूर्तावर घरात नवीन वस्तू, वाहन, दागिने यांची खरेदी केली जाते. या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्व सणवार, समारंभ साजरे होत असले, तरी परंपरागत  चालत आलेले रीतिरिवाज जपण्याचा नागरिकांचा उत्साह कायम आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर वाहन खरेदीचा नागरिकांचा उत्साह कायम आहे. प्रत्यक्ष खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठण्यासाठी अनेकांनी वाहनांचे बुकींग केले आहे. दसर्‍याला सोने खरेदीला विशेष महत्त्व असते. यंदाही दसऱ्याचे सोने लुटण्यासाठी ग्राहक सज्ज झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व स्तरातील
व्यावसायिकांकडे ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. सराफी व्यावसायिकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन डिझाईनचे दागिने उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच काहीजण नवनवीन ऑफर्स ही आणत आहेत.

सध्या नवरात्रीचे उपवास असल्याने उपवासाचे पदार्थ व फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. विविध फळांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे इच्छा असूनही घराबाहेर न पडता येणारेही दसऱ्याच्या खरेदीची हौस पूर्ण करून घेताना दिसत आहेत. सणा-सुदीच्या निमित्ताने घराबाहेर पडणारा ग्राहकवर्ग
येनकेन प्रकारे ‘कॅश’ करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसत आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून ‘लॉक’ असलेले व्यवसाय आत्ता कुठे ‘अनलॉक’ व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दसरा सण कॅश  करण्याकडे व्यापारी वर्गाचा कल आहे. खरेदी-विक्रीवर विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. तर डिस्काउंट, आकर्षक भेटवस्तू, एका वस्तूवर एक वस्तू फ्री अशा ऑफर्सचा वर्षाव ग्राहकांवर होत असल्याने ग्राहकही खरेदीसाठी सणाचा मुहूर्त साधण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे.


 

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.