महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातील दैनिक जनशक्ती वृत्तपत्र समूहाचे संस्थापक, संपादक व सिद्धिविनायक ग्रुपचे संचालक कुंदन दत्तात्रय ढाके ( वय 42 वर्षे ) यांचे आज ( दि. २८ डिसेंबर ) सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अतिशय तरुण वयात एका उमद्या संपादकाचे व व्यावसायिकाचे दुःखद निधन झाल्याने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंदन ढाके यांच्या पर्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या कुंदन ढाके यांनी पुण्यात बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जवळचे सहकारी म्हणूनही कुंदन ढाके यांची ओळख आहे. जळगांव येथील प्रसिद्ध दैनिक जनशक्ती हे त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू केले. एक दर्जेदार दैनिक कसे असावे याचे त्यांनी उदाहरण दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी दैनिक लेवाशक्ती हेही दैनिक सुरू केले. अल्पावधीत त्यांनी आपल्या वृत्तपत्राचा पुणे जिल्ह्यात जम बसविला होता.
कुंदन दत्तात्रय ढाके आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना अचानक चक्कर आली त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.