विधायक

स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, १८५ रक्तदात्यांनी केले रक्तदान, महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या वाटप

 

महाबुलेटीन न्यूज  
चाकण : आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हेच श्रेष्ठदान असून महाराष्ट्र राज्यात रक्त पुरवठा तुटवडा असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर चाकण येथे संपन्न झाले.

शिबाराचे उद्घाटन मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, दत्तात्रय गोरे, माणिक गोरे, विकासभाऊ गोरे, राहुलशेठ गोरे, नितीन गोरे, निलेश गोरे, उमेश गोरे, ओंकार सुरेशभाऊ गोरे, खेड तालुका शिवसेना प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, उपसभापती ज्योतीताई आरगडे, विजयाताई शिंदे, विजयाताई जाधव, कविताताई करपे, माजी सभापती अंकुश राक्षे, माजी जि.प. सदस्य किरण मांजरे, मा. पं. स. सदस्य अमृत शेवकरी, मा. नगराध्यक्ष शेखर घोगरे, मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, मा.नगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक प्रवीण गोरे, निलेश गोरे, रोनक गोरे, शंकर राक्षे, प्राचार्या प्रमिला गोरे, शिवसेना शहर प्रमुख महेश शेवकरी, विजयसिंह शिंदे, साजिद सिकिलकर, समीर सिकिलकर उपस्थित होते. सर्व शिवसेना पदाधिकारी चाकण परिसरातील खेडमधील असंख्य तरुण मंडळांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सिद्धिविनायक ग्रुप, आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचार्‍यांना साडी वाटप करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण खेड तालुका, स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण चाकण, कलाविष्कार मंच चाकण, ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, भामा इंग्लिश मिडियम स्कूल चाकण, अंधश्रद्धा निर्मुलन समिती चाकण यांनी केले होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.