पुणे जिल्हा

वृत्तपत्र क्षेत्रातील ‘भीष्माचार्य’ हरपला….

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर उर्फ बाबा शिंगोटे यांचे निधन

महाबुलेटिन न्यूज / हनुमंत देवकर
पुणे : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज दिनांक ६ ऑगस्ट २०२० दुपारी एक वाजता त्यांच्या त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुखवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत.

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ ला झाला. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते.

एक पेपर विक्रेता, संपादक आणि एका कंपनीच्या मालक पदापर्यंत पोहचणे ही सामान्य गोष्ट नाही, परंतु बाबांनी ते शक्य करून दाखविले. बाबांनी अल्पावधीत  मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणातून आपले नाव मोठे करून दाखविले. त्याकाळात जुन्नरचे दांगट व बाबा शिंगोटे यांनी अवघ्या मुंबईची वितरण व्यवस्था ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील ईनाडू, गुजरात मधील गुजरात समाचार, संदेश आदी पाच पंचवीस वृत्तपत्रांची वितरण एजन्सी ताब्यात घेऊन बाबांनी १९८०-९० च्या दशकात महाराष्ट्राच्या वृत्तपत्र वितरण क्षेत्रात आपला आगळावेगळा दबदबा निर्माण केला होता.

वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांनी १९९४ मध्ये ‘मुंबई चौफेर’ नावाचे सायं दैनिक सुरू केले. त्यानंतर ‘दैनिक आपला वार्ताहर’, ‘दैनिक यशोभुमी’, ‘दैनिक कर्नाटक मल्ला’, ‘तामिळ टाईम्स’, ‘हिंदमाता’ ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. कोणतेही भांडवल नसताना केवळ वाचकांच्या जोरावर त्यांनी वृत्तपत्रे सुरु केली. पुण्यनगरी मुळे तर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांनी महाराष्ट्रभर जिल्ह्या जिल्ह्यातून आवृत्या सुरु केल्या. प्रिंट मीडियातील खपाचा विचार केला तर त्यांनी आपला वेगळा वाचक वर्ग करून महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर वाचक वर्ग आपल्यासोबत कायम ठेवला. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे मालक असूनही अत्यंत साधपणाने राहत असे, त्यांनी खोट्या प्रसीद्धीला व प्रतिष्ठेला कधीच थारा दिला नाही. महाराष्ट्रभर प्रवास करताना कधी कोणत्या वार्ताहर, पेपर एजन्सी वाल्याकडे कशाचीही अपेक्षा न करता प्रसंगी भूक लागली तर वडापावाच्या गाडीवर थांबून वडापाव खाणारा हा माणूस अत्यंत साधेपणाने जगाला. आपल्या प्रत्येक सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात रमला.

बाबा म्हणजे एक व्यक्ती नव्हे तर ते विचारांचे भांडार होते. ज्यांना बाबांचा सहवास लाभला ते खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. खरोखर अशा व्यक्ती कित्येक हजारांतून जन्माला येत असतात आणि बाबांसारख्या व्यक्ती पुन्हा मिळणे दुर्लभच आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे आदरणीय बाबा एकमेव आणि अद्वितीयच म्हणावे लागेल. आदरणीय बाबांना महाबुलेटिन परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…..

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.