आदिवासी

कोविड सर्वेक्षण करणाऱ्यांना विमा कवच द्या, अन्यथा कामावर बेमुदत बहिष्कार : आदिवासी विकास संघटना

 

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : आदिवासी विकास विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, गृहपाल यांना कोविड सर्वेक्षणाची कामे देण्यात येत असून त्यांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे, अन्यथा या कामावर बहिष्कार टाकण्यात येईल अशी मागणी आदिवासी विकास संघटनेने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, ता. आंबेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड कालावधीत कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांची काळजी घेण्यात यावी. अनलॉक लर्निंग, खावटी कर्ज, डीबीटी, अनुसूचित जमाती सर्वेक्षण व इतर शाळाबाह्य कामे करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. तरी याबाबत ५० लाख विमा संरक्षण कवच व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना कोरोना संसर्ग झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी शासनाने घ्यावी व तसे आदेश काढावेत. तरच शाळाबाह्य कामे केली जातील, अन्यथा बेमुदत बहिष्कार आंदोलन केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे वाढत असलेला कोरोना संसर्ग प्रादुर्भाव व कर्मचाऱ्यांना येत असलेल्या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून प्रकल्पस्तरांवर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची आर्थिक देयके तात्काळ मंजूर करून सहकार्य करावे असेही निवेदनात म्हटले आहे.

आदिवासी विकास संघटनेच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राज्यातील २९ प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्याचे ठरले होते. त्यानुसार घोडेगावचे प्रकल्प अधिकारी आर. बी. पंढुरे यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गणेश गावडे, उपाध्यक्ष दादासाहेब सितापुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर, नवनाथ भवारी आदी उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

4 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

6 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

1 week ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 weeks ago

This website uses cookies.