निधन वार्ता

काँग्रेसचे जेष्ठ नेते भिमाजीशेठ गडगे यांचे निधन

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
नारायणगाव ( दि.१० ) : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमाजीशेठ कमळू गडगे ( वय ७५ ) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते. माजी आमदार वल्लभशेठ बेनके, माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या बरोबरीने त्यांनी तालुक्यात कामे केली. त्यांच्या निधनाने वडगांव आनंद, आळेफाटा परिसरात शोककळा पसरली आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

2 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

4 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

5 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

6 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

1 week ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 weeks ago

This website uses cookies.