महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ३३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात ११ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २ चाकण शहरातील आहेत. ग्रामीण भागात १८ रुग्णांची भर पडली असून तालुक्यातील ८२ ग्रामपंचायती कोरोना बाधित झाल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १४९४ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – १, चाकण – ११, आळंदी – ४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १८ ) : सोळू ६, कडाचीवाडी ३, निघोजे ३, खरपुडी बुद्रुक २, नाणेकरवाडी, कुरुळी, मरकळ व दोंदे प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३३
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – १४९४
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ३३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४३४
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १०२७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ११
# मयत झालेली व्यक्ती : ५ ( १ पुरुष वय ४५ वर्षे रा. नाणेकरवाडी, १ पुरुष वय ७२ वर्षे रा. वडगाव घेनंद, १ पुरुष चाकण, १ महिला वय ७० वर्षे रा. चाकण, १ पुरुष वय ४१ रा. खराबवाडी ( खराबवाडी येथील सदर पुरुष २३ जुलै २०२० रोजी जहांगीर हॉस्पिटल मध्ये मयत झाले असून शासकीय दप्तरी आज नोंद झाली आहे. )
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.