खेड

राजकीय किस्से : हा बारामतीच्या पवारांचा तालुका नाही…!

महाबुलेटिन नेटवर्क। शिवाजी आतकरी
खेडचे माजी आमदार स्व नारायणराव पवार यांनी तालुक्यावर स्वतःचे वर्चस्व सलग वीस वर्षे ठेवले. शरद पवार यांचे ते अनुयायी. मतदारांच्या मनावर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे त्यांनी राज्य केले. पुढे राजकीय काळाच्या ओघात नारायणराव पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेतली. अर्थात ही फारकत नारायणराव पवार यांना महागात गेली हा भाग वेगळा.
        नारायणराव पवार यांची रांगड्या भाषेतील आणि ठेवणीतील शब्दांची पेरणी असलेली भाषणे श्रोत्यांसाठी पर्वणी असे. त्यात विरोधकांवर टीका म्हटल्यावर त्यास धार असे. शरद पवारांपासून दूर गेल्यावर जी भाषणे नारायणरावांची राहिली, त्यात थेट शरद पवार यांना आव्हान असे. दस्तुरखुद्द शरद पवार यांना आव्हान म्हणजे राजकीय आत्मघात. असे असतानाही नारायणराव पवार यांनी ते आव्हान पेलले. राजकीय जिगर दाखवत ते पवारांवर टीका करीत राहिले. त्यातील काही वाक्ये आजही मतदारांच्या लक्षात आहेत. ती वाक्ये त्यावेळी माध्यमांमधून बातम्यांचा विषय झाली तर मतदारांमध्ये चर्चेचा…!
      शरद पवार आणि अजित पवार यांना आव्हान देत त्यावेळी स्व नारायणराव पवार म्हणाले होते, “हा खेड तालुका आहे. हा या पवारांचा तालुका आहे. बारामतीच्या पवारांचा नाही”. त्यावेळी असे बोलणे धाडसाचे होते. आजही नारायणअप्पांची भाषण शैली, रांगडेपणा येथील जुन्या जाणत्या लोकांना आठवतोय. तसेच हा बारामतीच्या पवारांचा नाही तर या पवारांचा तालुका आहे, हेही अनेकांना आठवतेय. या वाक्याच्या अनुषंगाने त्यावेळी चर्चा घडली. हेच वाक्य पुढे राजकीय किस्सा बनून राहिले.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

20 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.