कोरोना

महाबुलेटीन रक्षाबंधन स्पेशल : डॉक्टरच झाल्या कोरोनाग्रस्तांच्या भगिनी

इंदापूरातल्या विलगीकरणात साजरे झाले रक्षाबंधन
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : कोरोनाचा ठपका पडलेला रुग्ण एकाअर्थी विलगीकरणाच्या व्याख्येद्वारे काही दिवसांसाठी समाजापासून बाजुला टाकला जातो. त्यांना आप्तेष्ट, मित्रांना भेटणे अशक्य होते. यातच रक्षाबंधनासारखा सण आला तर रक्ताच्या नात्यातील बहिण भावांना भेटणे अशक्यच असते. ही मानसिक वेदना शारिरीक वेदनेपेक्षा जास्त यातना देते. मात्र या यातनांवर ही येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी इलाज काढला. येथील विलगीकरण कक्षात कोरोनावर उपचार घेत असणा-या भावांच्या भगिनी होवून त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
डॉ. सुजाता खुसपे व डॉ. दीपाली कोकरे हे या बहाद्दर महिला डॉक्टरांची नावे आहेत. गेल्या तीन साडेतीन महिन्यांपासून येथील शासकीय वसतिगृहात विलगीकरण कक्ष थाटला गेला आहे. कोरोनाग्रस्तांना तेथे आणले जाते. उपचार होतात. बरे झालेले त्यांच्या घरी जातात. गंभीर असणारे पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवले जातात. मागील दोन आठवड्यापासून उपचारासाठी येणारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. सेवा सुश्रूषेचा ताण वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या सहका-यांवर आहे. मात्र कोणी ही आपल्या कर्तव्यात कसूर करत नाही.
रक्षाबंधनाच्या काळात तेथे दाखल असणा-या रुग्णांच्या बहिणींची इच्छा असून ही वैद्यकीय सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तेथे येणे अशक्य आहे. बहिण भावाच्या नात्यातील ह्या सर्वात पवित्र असणा-या सणाला भावांची मनगटे सुनीसुनी रहाणार, बहिणींचे डोळे आसवांनी भरणार हे चित्रच अस्वस्थ करणारे वाटल्याने या सर्व भावांना राखी बांधण्याचा निर्णय या दोन्ही डॉक्टरांनी घेतला. या द्वारे आपल्यासाठी काहीतरी करणारे कोणी आहे, ही भावना कोरोनाग्रस्तांमध्ये सकारात्मकता निर्माण करेल, अशी खात्री त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी आपला निर्णय अंमलात ही आणला. त्यांच्या या कृतींमुळे यंदाचे रक्षाबंधन कोरोनाग्रस्तांच्या कायमचे लक्षात राहणार आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 02 Aug 2026

शुक्रवार, ३१ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आज…

22 hours ago

MahaBulletin — 31 Jul 2026

गुरुवार, ३० जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 29 Jul 2026

मंगळवार, २८ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 days ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

2 weeks ago

This website uses cookies.