गुन्हेगारी

“हप्ता द्या, नाहीतर विकेट काढीन” – माथाडी ठेकेदारांची कंपनीला धमकी…

 

चाकण एमआयडीसीत माथाडीच्या नावाखाली खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी, ५ खंडणी खोरांना अटक, म्हाळुंगे पोलिसांची कारवाई, रोख रक्कम सह बुलेट व सोलेरिओ गाडी जप्त

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण एमआयडीसी : चाकण एमआयडीसीत माथाडीच्या नावाखाली खंडणी मागून कुरुळी गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खंडणी खोरांवर म्हाळुंगे पोलिसांनी कारवाई करून ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हजाराची खंडणीची रक्कम जप्त केली असल्याची माहिती म्हाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडली. याप्रकरणी कुरुळी येथील एका कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हाळुंगे पोलीस चौकीत बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२० राजी फिर्याद दिली असता पोलिसांनी कंपनीत सापळा रचून खंडणी मागण्यासाठी आलेल्या माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय शंकर कौदरे ( वय ३९ ), प्रदीप रामचंद्र सोनवणे ( वय ३३, दोघेही रा. खरोशी, ता. खेड, जि. पुणे ), गणेश दशरथ सोनवणे ( वय ३३, रा. कुरुळी, ता. खेड ), स्वप्नील अजिनाथ पवार ( वय २९, रा. एकतानगर, चाकण ) व धोंडिबा उर्फ हनुमंत विनायक वडजे ( वय ३२, रा. मेदनकरवाडी, चाकण ) यांना अटक केली.

आरोपींनी आपसात कट रचून अनधिकृतपणे कंपनीत प्रवेश केला व “कंपनी चालवायची असेल तर त्यांचे वेदांत एंटरप्रायजेस नावाचे नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीमध्ये नेमल्याचे दाखवून प्रत्यक्ष त्यास कामावर न घेता त्याचे पगार रक्कम व इतर चार्जेस असा एकूण २२ हजाराचा हप्ता प्रत्येक महिन्याला द्या, नाहीतर तुमच्याकडे बघून घेईन, तुमची विकेट काढीन”, अशी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मगितल्याची फिर्याद देण्यात आली. तक्रार देताच आरोपींवर भा. द. वि. कलम ३८५, ३८७, ४५२, १४३, १४९, १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी आजच खंडणीची रक्कम घेण्यासाठी कंपनीत येणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक अरविंद पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तात्काळ दोन पंचांसह कंपनीत सापळा रचून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून स्वीकारलेली खंडणीची रक्कम २० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली एक बुलेट दुचाकी व सेलेरिओ कार हस्तगत केली.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार राजेंद्र कोनेकरी, संपत मुळे, प्रशांत वहिले, अमोल बोराटे, शाहनवाज मुलाणी, अजय गायकवाड, पवन वाजे यांनी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर हे पुढील तपास करीत आहेत.

यापुढे औद्योगिक परिसरात माथाडी, स्क्रॅप व कंपनीतील इतर कामे मिळवण्यासाठी कोणी गैर मार्गाचा अथवा दादागिरीचा अवलंब करून औद्योगिक शांतता भंग करीत असल्यास कंपनी व्यवस्थापनाने निर्भीडपणे समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी २ महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर औद्योगिक परिसरातील कंपन्यांमध्ये जर कोणी जबरदस्तीने विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्टसाठी माथाडीच्या नावाने, तसेच स्क्रॅपसाठी जबरदस्ती करणे, खंडणी मागणे व त्यासाठी धमक्या देत असल्यास त्याचे विरुद्ध मोका सारख्या कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत भूमिका घेतली आहे. यासंदर्भात चाकण व म्हाळुंगे एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींची मीटिंग घेऊन निर्भीडपणे तक्रार देण्याचे आवाहन केले होते.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.