निवड/नियुक्ती

आळंदी उपनगराध्यक्षपदी सागर बोरुंदिया

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी

आळंदी : आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी सागर बोरुंदिया यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी आळंदी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.   

आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रसंगी भाजपचे गटनेते पांडुरंग वहिले, शिवसेनेचे गटनेते तुषार घुंडरे, मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचेसह सभेस १४ सदस्य उपस्थित होते. तर या विशेष सभेकडे तब्बल ५ नगरसेवकांनी पाठ फिरवत गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा राहिली. आळंदीच्या उपनगराध्यक्षा मिराताई पाचुंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षीय धोरणानुसार या पदावर इतर सदस्याला काम करण्याची संधी  मिळावी म्हणून राजीनामा दिला होता.

नगरपरिषदेच्या विशेष सभेत उपाध्यक्ष निवडीसाठी सदस्य सागर बोरुंदिया यांचा एकमेव अर्ज आल्याने उपाध्यक्षपदी त्यांची बिनविरोध वर्णी लागली. आळंदीत ठराविक मुदती नंतर इतर पदाधिकारी यांना संधी मिळावी यासाठी राजीनामास्त्र उपसले जाते. इतर नगरसेवकांना संधी मिळावी म्हणून राजीनामा देण्यात आला होता. प्रभाग क्रमांक एक, तीन, पाच व सात या प्रभागतील नगरसेवकांना या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. उर्वरित प्रभागतील नगरसेवकांत संधी मिळावी म्हणून खलबते सुरू होती. प्रभाग क्रमांक तीन ला एकाच टर्म मध्ये सलग दुसर्‍यांदा उपाध्यक्ष पदाची संधी बोरुंदिया यांचे रूपाने मिळाली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी भंडार्‍याची उधळण करीत मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. काही दिवसांनंतर राजीनामा दिल्यावर पुन्हा इतर सदस्याला संधी देण्यात येणार आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.