पुणे जिल्हा

मराठी पत्रकार परिषदेची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक बारामती येथे संपन्न

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
बारामती : मराठी पत्रकार परिषदेची राज्यस्तरीय कार्यकारणीची बैठक कोरोनामुळे गेले आठ महिने झाली नव्हती, परंतु ठरल्याप्रमाणे बारामती येथे बैठक संपन्न झाली.

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे मराठी पत्रकार परिषदेची कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. बैठक दोन सत्रामध्ये पार पडली. पहिल्या सत्रामध्ये शिवसेना आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व TVAJ मुंबई या संघटनेचे अध्यक्ष, पत्रकार विनोद जगदाळे यांचा उल्लेखनिय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जगदाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “खोट्याला खोटं बोलणं हीच खरी पत्रकारिता आहे. मंत्रालयातून बेकायदेशीररित्या अधिस्वीकृती कार्ड वाटले जात आहेत, त्यावरही मराठी पत्रकार परिषदेने आवाज उठवावा, अशी मागणीही त्यांनी एस. एम. देशमुख सरांकडे केली.

चिवटे म्हणाले, “कोरोना काळात बारा हजार रुग्णांना आम्ही मोफत व सवलतीच्या दरात मदत केली. पत्रकारांना आरोग्य बाबतीत कोणतीही समस्या असेल, तर त्यांना मी शक्यतो जेवढी मदत होईल तेवढी करेल. आई-वडिलांच्या उपस्थितीत सत्कार होतो हे माझे भाग्य समजतो. पत्रकार तसेच सामान्य नागरिकांना आरोग्याबाबत अडचण आल्यास त्यांनी आपला मोबाइल नंबरही सर्वांना दिला. आरोग्याच्या बाबतीत मदतीसाठी कामी येणाऱ्या एका पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करून उपस्थितांना वाटपही करण्यात आले.

यावेळी आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांनीही उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी देखील दोघांच्या कामाचे कौतुक केले व पत्रकारांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेेेळी विविध विषयावर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक प्रमुख जान्हवी पाटील, उपाध्यक्ष यशवंत पवार व सुरेश नाईकवडी, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, विशाल साळुंखे, विभागीय सचिव मन्सूर भाई, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे खेड तालुका अध्यक्ष हनुमंत देवकर, शिरूर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.