उद्योग विश्व

सीएनएच न्यू हॉलंड कंपनीमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन. डी. आर. एफ.) यांच्या द्वारा आयोजित प्रात्याक्षिकांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

 

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण एमआयडीसी : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून सीएनएच न्यू हॉलंड कंपनी चाकण मध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन. डी. आर. एफ.) यांच्या प्रात्याक्षिकांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. 

४ मार्च ते ११ मार्च या काळात संपूर्ण जगभरातील औद्योगिक क्षेत्रात “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” साजरा केला जातो. यावर्षीचा सुरक्षा सप्ताहाचा विषय होता नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण. 

यामध्ये प्रामुख्याने भूकंप, आग, पूर, भूस्खलन आणि रसायन गळती या आपत्ती संदर्भात मागदर्शन करून या आपत्ती आल्याचे ओळखण्यासाठीचे घरगुती उपाय, आपत्ती आल्यावर घ्यावयाची काळजी, त्यामधून होणारी इजा व त्यावरचे उपाय आणि मानव हानी कमी करण्याचे उपाय यांचे प्रात्याक्षिक एन. डी. आर. एफ. जवानांनी केले. 

कामगार सुरक्षित; तर कारखाना सुरक्षित, कारखाना सुरक्षित; तर समाज सुरक्षित आणि समाज सुरक्षित; तर देश सुरक्षित, हा फार मोलाचा संदेश यावेळी एन. डी. आर. एफ. चे वतीने असिस्टंट कमांडण्ट श्री कुमार राघवेंद्रा यांनी दिला. आणि पुढील काळात चाकण येथील औद्योगिक क्षेत्रात असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. तसेच यावेळी सीएनएच न्यू हॉलंड कंपनी चाकणचे प्लांट हेड किशोर देवळे यांनी एन. डी. आर. एफ. आपत्ती व्यवस्थापन करत असलेल्या भरीव कार्याचा उल्लेख करीत सर्व उपस्थित जवानांचा गौरव केला.

या कार्यक्रमास एन. डी. आर. एफ.चे वतीने डेप्युटी कमांडंट श्री प्रमोद कुमार सिंग, असिस्टंट कमांडण्ट श्री कुमार राघवेंद्रा, इन्स्पेक्टर श्री राजेंद्र पाटील, इन्स्पेक्टर श्री जेना हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व समन्वयक म्हणून कंपनीचे संपर्क अधिकारी श्री शंकर साळुंखे यांनी भूमिका पार पाडली, तर मानवी संसाधन विभाग प्रमुख सौ शीतल साळुंके यांनी आभार व्यक्त करून या कार्यक्रमातून कंपनीतील कामगार व अधिकारी याना मिळालेल्या माहितीतून नक्कीच कंपनीला आणि त्यांचे कुटुंबाला फायदा होईल असे मत व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मानवी संसाधन व प्रशासकीय विभागातील प्रशांत बेलवटे, शैलेश जाधव, ब्रिजेश शाहू, आनंद जोशी, अमित कणसे, रिया सोळंकी, आकाश पिंजण तर सुरक्षा विभागातील सुधाकर पाटील आणि लक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले.
———

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.