महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील वार्ड निहाय मतदार यद्यांनाबाबत कार्यकर्त्यांनी जागरूक रहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केले आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वार्ड निहाय कार्यकर्यांनी मतदार यादीचा सखोल अभ्यास करून वार्ड मधील रहिवाशी, ज्यांची नावे अजून मतदार यादीत समाविष्ठ नाहीत त्यांची नावे मतदार यादीत नोंदवण्याचे काम सुरू करावे. तसेच प्रत्येक वॉर्ड मध्ये काही प्रमाणात वॉर्ड मधील रहिवासी नसताना देखील नावे घुसवण्यात आल्याने सदर बोगस नावे मतदार यादीतून वागळण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, अशा सूचना आवारे यांनी दिल्या आहेत.
निवडुक आयोगाने मतदार यादी निश्चित करताना जनगणना करणे अपेक्षित आहे. जनगणना केल्याने बोगस मतदारांना थारा मिळणार नाही, त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यास मदत होईल, असे मत किशोर आवारे यांनी व्यक्त केले.
स्थलांतरित, विवाहित कन्या, तसेच मृत मतदारांची नावे कमी करण्यात यावीत. मताधिक्य वाढावे यासाठी काही मंडळी इतरत्र राहणारे मतदार आपल्या वॉर्ड मध्ये घुसवून मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होते. अशा गोष्टींना आळा बसावा यासाठी वार्ड मध्ये रहात नसणाऱ्या मतदारांचे नाव कमी करण्यात यावे तसेच असे किती मतदार आहेत याची वॉर्ड निहाय यादी तयार करून निवडणुक आयोगाकडे वेळीच तक्रार वॉर्ड प्रमुखांनी करावी, अशा सूचना आवारे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
● पारदर्शी निवडुक होण्यासाठी योग्य मतदारांची नोंद मतदार यादीत होणे गरजेचे आहे, बोगस नावे कमी करण्याबाबत पाठपुरावा करू
— किशोर आवारे
संस्थापक अध्यक्ष जनसेवा विकास समिती
——
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.