महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे दि 30 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणात इच्छूकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील, त्यांनी दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी. पत्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. हा डी.डी. ‘R.T.O. Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहिल. ( डी.डी. एक महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा )
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची सांक्षाकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. ( उदा.लाईटबील, टेलीफोन बील, इत्यादी ) तसेच अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र ( उदा. आधारकार्ड,/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट/पॅनकार्ड इत्यादी ) ची साक्षांकित प्रत सादर करावी.
एकाच क्रमांका करीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन नोटिस बोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डी.डी. दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. हा डी.डी. किमान 301 रुपयांपेक्षा जास्त तसेच डी.डी. ‘R.T.O. Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज शेड्यूल बँकेचा पुणे येथील असावा. डी.डी. Pune R.TO. या नावाने असल्यास तो बाद समजण्यात येईल. ( दुपारी 3 वाजलेनंतर डी.डी. स्विकारले जाणार नाहीत. ) त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमूना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.