शैक्षणिक

खेड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भरती, गरजू महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड तालुक्‍यामध्ये रिक्त झालेल्या १३ पदांवर नव्याने अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी दिली. त्यासाठी इच्छुक महिलांनी ( दि. ९ नोव्हेंबर ) पर्यंत आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे खेड पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जमा करावीत, असे त्यांनी सांगितले आहे.

तालुक्‍यातील आठ बीटांमधील एकूण १३ अंगणवाड्यांमध्ये ही भरती प्रक्रिया केली जाणार असून; घिगेवस्ती, बांगरवाडी (कुडे बीट), तळपेवाडी, बुरसेवाडी (वाडा बीट), थिटेवाडी (खेड बीट), धामणगाव खुर्द (डेहणे बीट१), मंदोशी, कारकुडी, भोमाळे खालचे (डेहणे बीट २), कान्हेवाडी बुद्रुक, कडधे १ (चास बीट), सायगाव (कडूस बीट), जऊळके खुर्द (वाफगाव बीट) या ठिकाणी नव्याने अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. 

अंगणवाडी सेविका पदासाठी शैक्षणिक अर्हता किमान दहावी पास असून; उमेदवार स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. २१ ते ३० वयोगटातील महिला या पदासाठी अर्ज करू शकतील. तसेच लहान कुटुंब, घरी शौचालय असणे, रेशनकार्डमध्ये नाव, अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, पदाचा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची, अंगणवाडी मिनी अंगणवाडी, जिल्हा परिषद समाजकल्याण केंद्रीय व समाज कल्याण बोर्ड, महानगर पालिका, नगर परिषद अशा शासकीय संस्थेत काम केल्याच्या अनुभव असेलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

ज्या गावात अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार आहेत त्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये अर्जाचा नमुना, शैक्षणिक अर्हता आणि आवश्‍यक कागदपत्र याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.