पुणे जिल्हा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मा. आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे कुटुंबियांचे केले सांत्वन…

मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष गोरे कुटुंबियांच्या पाठीशी, खेड तालुक्यात यापुढे कसलीही दहशत खपवून घेतली जाणार नाही : खासदार संजय राऊत

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क 
चाकण : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

राजकारणात अनेक पदे भूषविलेली असूनही प्रेमळ, विनम्र, मनमिळाऊ असणारा हा अजातशत्रू कोणताही अहंकार नाही, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा नेता म्हणजे सुरेशभाऊ गोरे यांच्या आकस्मिक जाण्याने या भागातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एखादा माणूस आपल्यातून निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होणे कशाला म्हणतात, ते म्हणजे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही सर्व शिवसैनिक, शिवसेना पक्ष गोरे कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चाकण येथे केले. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ते चाकण येथे गोरे यांच्या निवासस्थानी आले होते.

खा. संजय राऊत पुढे म्हणाले की, “तालुक्यात कसलीही दहशत खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेने मंजूर केलेली कोणतीही विकास कामे या तालुक्यात थांबू दिली जाणार नाहीत. या तालुक्यातील कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा बैठक घेऊन तालुक्‍यातील पक्षाची घडी विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच गोरे कुटुंबियांना सोबत घेऊन खेड तालुक्यात शिवसेना पक्ष आपली वाटचाल करेल”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला आघाडीच्या नेत्या विजयाताई शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, युवा नेते विजय शिंदे, नगराध्यक्षा स्नेहाताई जगताप, सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, गोरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

2 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

6 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.