चाकण नगरपरिषदच्या वतीने उद्या शहरातील युवक युवतींसाठी उद्योग कर्ज मेळाव्याचे आयोजन…
महाबुलेटीन न्यूज l चाकण
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP, जिल्हा उद्योग केंद्र आणि दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत चाकण नगरपरिषदच्या वतीनेशहरातील युवक–युवतींसाठी उद्योग कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनीदिली.
मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच ज्यांचे सर्व कागदपत्रे व प्रकल्प अहवालतयार आहेत, त्यांचे ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरण्यात येणार आहेत.
मेळाव्याच्या स्थानी इच्छुक उद्योजकाने वैयक्तिक व व्यवसायाची आवश्यक कागदपत्रे दस्तऐवज व शक्य असल्यास प्रोजेक्ट रिपोर्टसह( Project Report ) हजर रहावे.
चाकण शहरातील 18 ते 45 वयोगटातील सर्व इच्छुक नागरिकांनी कागदपत्रांसह मेळाव्यात हजर राहावे.
# ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्रे
1)पासपोर्ट साइज फोटो
2)आधार कार्ड
3)जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4)शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र ( आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा, जसे 10 वी, 12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र, वेबसाईटवरिल मेनूमध्ये मिळेल ( Undertaking Form )
6)प्रकल्प अहवाल
7)जातीचे प्रमाणपत्र ( अ.जा. /अ.ज. असेल तर )
8)विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( उदा. माजी सैनिक, अपंग )
=========================
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.